सेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर

By admin | Published: June 9, 2017 03:11 AM2017-06-09T03:11:33+5:302017-06-09T03:11:33+5:30

महापौरपदाकरिता उद्या (शुक्रवार) दुपारी मनपा सभागृहात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर बसल्याचे चित्र पाहायला मिळेल

Congress Mayor with the help of Sen. | सेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर

सेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महानगरपालिकेच्या सातव्या महापौरपदाकरिता उद्या (शुक्रवार) दुपारी मनपा सभागृहात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर बसल्याचे चित्र पाहायला मिळेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. शिवसेनेत फाटाफूट घडवून उपमहापौरपद काबीज करण्याची खेळी करण्याच्या हालचाली भाजपाने सुरूच ठेवल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक होणार आहे.
सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस पक्षास बहुमत दिले. मात्र, शिवसेनेसोबत सत्ता वाटून घेण्याची परंपरा कायम राखत काँग्रेसने शिवसेनेला उपमहापौरपद देऊ केले आहे.
महापौरपदाकरिता सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत, तर उपमहापौरपदाकरिता सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदाकरिता काँग्रेसचे जावेद दळवी व भाजपाच्या शाहिन सिद्दीकी यांच्यात लढत होईल. उपमहापौरपदाकरिता शिवसेनेचे मनोज काटेकर यांना कोणार्कचे नितीन पाटील आव्हान देतील, अशी चर्चा आहे.
भिवंडीत भाजपाचा महापौर बसवण्याची भाषा खासदार कपिल पाटील यांनी केली होती. मात्र, काँग्रेसला भक्कम यश मिळाल्यावर पाटील यांचे मनसुबे डामाडौल झाले. शिवसेनेत फाटाफूट घडवून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील दुसऱ्या गटाच्या व्यक्तीला महापौर करण्याची किंवा शिवसेनेतील एक गट व अन्य पक्ष यांची मोट बांधून कोणार्कच्या उमेदवाराला उपमहापौर करण्याच्या हालचाली पाटील यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात ते कितपत यशस्वी होतील, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Congress Mayor with the help of Sen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.