काँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 04:23 PM2019-09-02T16:23:10+5:302019-09-02T16:30:45+5:30
आपल्या पत्नीसोबत टिकटॉकवर व्हिडिओ बनवला होता, जो की खाजगी होता.
मुंबई – टिकटॉक हे नेटीझन्सचे आवडते ऑप बनले आहे. मजेशीर व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळालेलं व्यासपीठ हे टिकटॉकचं वैशिष्ट आहे. मात्र बिहारमधील काँग्रेसच्या एका आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे महागात पडले आहेत. स्वःताच्या पत्नीसोबत बेडरूममध्ये बनवलेला व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असल्याने या आमदाराने पोलिसात धाव घेतली असून, पत्नीचा टिकटॉक हॅक झाल्याची तक्रार दिली आहे.
बिहारच्या सिकंदरा मतदारसंघाचे आमदार सुधीर कुमार यांचा आणि त्यांचा पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मिडिया प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पोलिसात गेले आहे. आमदार कुमार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, त्यांनी आपल्या पत्नीसोबत टिकटॉकवर व्हिडिओ बनवला होता, जो की खाजगी होता. मात्र कुणीतरी त्यांचा पत्नीचा अकाउंट हॅक केले असून, त्यांचा खाजगी व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने माझी बदनामी होत असल्याचे सुद्धा कुमार म्हणाले आहेत. तेसेच व्हायरल होत असलेला व्हिडिओ खाजगी होता, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक करण्याची मागणी सुद्धा आमदार कुमार यांनी केली आहे. मात्र असे असले तरीही या आमदार साहेबांना टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे चांगलेच महागात पडले आहे, हे निश्चित.