"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:00 PM2020-07-17T14:00:12+5:302020-07-17T14:01:22+5:30

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास

Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur | "भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा दावादेखील त्यांनी केला. महाराष्ट्रानं देशाला नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करेल, असंदेखील त्या म्हणाल्या.

ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल, असं म्हटलं. त्यावर बोलतान भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर नीट लक्ष ठेवावं, असं सूचक विधान ठाकूर यांनी केलं. त्या न्यूज१८शी बोलत होत्या.

त्याआधी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं. 'कोरोना संकट काळात महाविकास आघाडी सरकारबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. सत्तेत नसल्यानं काहींना असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे,' अशा शब्दांत आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले.

त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं पवार म्हणाले. पक्ष तीन असले, तरीही त्यांचा उद्देश एकच असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.