मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By admin | Published: January 4, 2017 01:47 AM2017-01-04T01:47:23+5:302017-01-04T01:47:23+5:30

केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यस्तरावर विविध समित्यांची मंगळवारी स्थापना

Congress movement against Modi government | मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Next

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यस्तरावर विविध समित्यांची मंगळवारी स्थापना करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.
सरकारच्या गेल्या अडीच वर्षांत संविधानाने निश्चित केलेल्या संकल्पनेला धोका निर्माण झाला आहे, तसेच नोटाबंदी हा देशातील आजवरचा सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणून समोर आला आहे. काँग्रेस ही जनतेची चळवळ असल्याने पक्ष म्हणून ही राष्ट्रव्यापी प्रचार मोहीम हाती घेत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उपाध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांच्याकडे देण्यात आले आहे. निमंत्रक सचिव सावंत असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Congress movement against Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.