Maharashtra Politics: “PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:26 AM2022-10-04T06:26:57+5:302022-10-04T06:27:38+5:30

Maharashtra Politics: लम्पी आजार नायजेरियातून आला असून, चित्तेही तिथूनच आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे.

congress nana patole claims that lampi virus spread after central modi govt introduced cheetah in india | Maharashtra Politics: “PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा

Maharashtra Politics: “PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा

Next

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध मुद्द्यांवरुन राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे देशभरात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला असून, यावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अजब दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातून आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले, असा आरोप नाना पटोले यांनी केला. महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील सध्याचे सर्वात मोठे संकट आहे पण मोदी सरकारच्या काळात नोकऱ्यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या संपवण्याचे काम केले गेले, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या युपीए सरकारच्या काळात विकासदर उच्चांकी होता. २४ कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारच्या काळात चुकीच्या धोरणांमुळे विकास दर घसरत आहे. २७ कोटी जनता पुन्हा गरिबी रेषेत गेली, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही गरिबीबद्दल बोलतात पण त्यातून जनतेच्या हिताचे निर्णय मोदी सरकार घेताना दिसत नाही. काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी सातत्याने हेच मुद्दे मांडून केंद्र सरकारला जाब विचारत असतात. भारत जोडो यात्रेतही महागाई, बेरोजगारी, सामाजिक विषमता हे मुद्दे उचलून धरले जात आहेत. ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ अशी परिस्थिती आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर आसूड ओढले जात आहेत, लोकांमध्ये प्रचंड संताप असूनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. राष्ट्रीय स्वसंयेवक संघाला त्याची जाणीव झाली हे विशेष म्हणावे लागेल परंतु देशात खरी सामाजिक विषमता ही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच परसवली व रुजवलेली आहे. त्यांना खरेच चिंता वाटत असेल तर त्यांनी मोदी सरकारला त्याबाबत जाब विचारावा, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress nana patole claims that lampi virus spread after central modi govt introduced cheetah in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.