Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:16 PM2022-10-31T14:16:39+5:302022-10-31T14:17:02+5:30

Maharashtra News: विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, पण घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जातेय, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

congress nana patole criticized balasahebanchi shiv sena shinde group over corruption and security decision | Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?”

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?”

googlenewsNext

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिंदे गटातील आमदार-खासदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावरून शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजपचे समर्थक असलेल्या आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद टोकाला गेला. रवी राणा यांनी शब्द मागे घेतले असले तरी बच्चू कडू यांनी यावर अधिक प्रतिक्रिया दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर टीका केली असून, शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार, अशी विचारणा नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करतायत, त्याची चौकशी कोण करणार, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. 

खोके वाचवायला सुरक्षा व्यवस्था दिली जाते

शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी ५० खोके घेतले, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, गुजरातमध्ये पूल पडला त्यातील आकडा मोठा आहे. तो अजून वाढण्याची शक्यता आहे. आकडेवारी जी समोर येतेय, त्याहीपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होते. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असे नाना पटोले म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress nana patole criticized balasahebanchi shiv sena shinde group over corruption and security decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.