“तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे”; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:12 PM2023-04-14T12:12:16+5:302023-04-14T12:13:51+5:30

Nana Patole Replied Devendra Fadnavis: केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’चे सरकार असून, शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole replied bjp dcm devendra fadnavis statement over mahavikas aghadi vajramuth sabha | “तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे”; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

“तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे”; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

googlenewsNext

Nana Patole Replied Devendra Fadnavis: महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप तसेच शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचे छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही. महाविकास आघाडीची अवस्था सध्या फारच वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी ९ वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी १२ आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो. या भोंग्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच काँग्रेसमध्ये कोणी राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येतोय. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आमची वज्रमूठ ही विकासाची असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे

केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डबल इंजिन’चे सरकार असल्याचे सांगतात. मग, राज्यातील शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे. गेल्या एक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले जाते. पण, फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदी करण्यात आला नाही. हरभरा, मका, तूर शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत. बेरोजगार आणि गरिबांचे बेहाल सुरू असून, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा लोकांना फायदा मिळवून द्या. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना काहीच मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या हातातील सत्तेचा उपयोग स्वत:साठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे, हे फडणवीसांनी पाहावे. तसेच, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठे’ला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. देशातील लोकशाही आणि संविधान टिकावे, हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे सांगत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर पलटवार केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress nana patole replied bjp dcm devendra fadnavis statement over mahavikas aghadi vajramuth sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.