"ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून वाझेंचा मुद्दा"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:20 PM2021-03-09T19:20:36+5:302021-03-09T19:26:39+5:30

Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze : "मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही." :

Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze | "ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून वाझेंचा मुद्दा"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

"ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून वाझेंचा मुद्दा"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next

मुंबई - केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक इंधनदरवाढ, त्यामुळे वाढलेली महागाई, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, फडणवीस सरकारच्या काळातला महाऑनलाईन घोटाळा, मराठा आरक्षण प्रकरणातील केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू असलेली लूट, अशा मुद्द्यांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असून त्यासाठीच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझेंचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे. 

पटोले यांनी मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही. असे असतानाही विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक वाझेंचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुद्दामहून वाझेंचे नाव घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांकडून सुरू आहे असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून मुकेश अंबानी यांची अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कशी काय जाऊ शकते, असेही पटोले म्हणाले आहेत. 

"आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात

धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष राज्यात सत्ता भोगली पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असं नाना पटोले यांनी याआधी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. पाच वर्ष राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी असे आवाहन करून सन्मानाची वागणूक व समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करू असे पटोले म्हणाले.

 

Web Title: Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.