‘कॉँग्रेस-राष्ट्रवादीमुळे राज्य आर्थिक संकटात’
By admin | Published: October 1, 2014 01:48 AM2014-10-01T01:48:16+5:302014-10-01T01:48:16+5:30
कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही.
Next
>पंढरपूर (जि़ सोलापूर) : कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही. कारण कर्ज घेतले परंतु ते कामाला न वापरता स्वत:च्या तिजो:या भरण्यासाठी वापरला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
पंढरपूरातील टिळक स्मारकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी. आमदार सुधाकर परिचारक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
आतार्पयत 15 निवडणूका झाल्या पण प्रश्न तेच आहेत. यामध्ये रस्ते, आरोग्य, तरुणांसाठी नोक:या, शेतमालाला चांगला भाव नाही हे प्रश्न आजर्पयत का सुटू शकले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली़ (प्रतिनिधी)
पाडुरंगाला साकडे
‘पांडुरंगा यंदा असा काही चमत्कार कर की, तुझी आषाढीची शासकीय पुजा करण्याचा मान शेतक:याच्या पोराला मिळाला पाहिजे.’ असे साकडे पांडुरंगाला घातले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले