काँग्रेस-राष्ट्रवादीतच जुंपली!

By admin | Published: July 17, 2015 12:34 AM2015-07-17T00:34:04+5:302015-07-17T00:34:04+5:30

भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून गेले तीन दिवस सरकारविरोधात एकत्रपणे लढणाऱ्या या दोन प्रमुख

Congress-NCP jointly joined! | काँग्रेस-राष्ट्रवादीतच जुंपली!

काँग्रेस-राष्ट्रवादीतच जुंपली!

Next

- अतुल कुलकर्णी,  मुंबई
भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून गेले तीन दिवस सरकारविरोधात एकत्रपणे लढणाऱ्या या दोन प्रमुख विरोधीपक्षांत चांगली जुंपली. झाले ते चूकच असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मान्य केल्यानंतरही बैठकांचे सत्र दुपारपर्यंत चालू राहिले. शेवटी झालेली चूक दुरुस्त केली जाईल, सगळा प्रकार दिल्लीत श्रेष्ठींना कळवला जाईल, असे काँग्रेसकडून सांगितल्यानंतर कामकाजात सहभागी होण्यावर एकवाक्यता झाली.
भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाल्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे तर गोंदियात राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष राहील, असा निर्णय मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले गेले. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेत आ. गोपाळ अग्रवाल यांनी भाजपाशी हातमिळवणी करीत काँग्रेसचा अध्यक्ष आणि भाजपाचा उपाध्यक्ष करून टाकला. त्याचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात दोन्ही काँग्रेसमध्ये उमटले. सकाळी दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे राष्ट्रवादीने पाठ फिरवली. तेव्हा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. संजय दत्त यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्याकडे पाठवले. दोघांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सोबत आंदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर सूत्रे गतीने हलली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण तातडीने विधान भवनात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, विजय वडेट्टीवार, सुनील केदार हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात जमले. तेथे तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आधीच होते. दोन्ही पक्षनेत्यांमध्ये तीव्र शब्दांत बोलणी झाली. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सामंजस्याची भूमिका घेत झाले ते चूकच झाले आहे. आता ती चूक दुरुस्त करण्यास काही वेळ लागेल. पण अधिवेशनात आत्ताच निर्णय घ्यावे लागतील, असे सांगून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका मांडली. त्यावर आम्हाला चर्चा करावी लागेल, असे सांगत राष्ट्रवादीने ती बैठक संपवली.

नेमका वाद
का झाला?
गोंदिया जिल्हा परिषदेत आ. गोपाळ अग्रवाल यांनी भाजपाशी हातमिळवणी करीत काँग्रेसचा अध्यक्ष आणि भाजपाचा उपाध्यक्ष करुन टाकला. त्याचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात दोन्ही काँग्रेसमध्ये उमटले.

दुही...
सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. काँग्रेसने आक्रमक होत घोषणाबाजी सुरु केली. मात्र राष्ट्रवादीचे सदस्य शांत राहिले. सरकारच्या विरोधात घोषणा देत आम्ही सभात्याग करतो, असे विखे पाटील यांनी जाहीर केले मात्र त्यामध्येही राष्ट्रवादी सहभागी झाली नाही. त्याचवेळी विधान परिषदेत मात्र दोन्ही काँग्रेसने बहिष्काराची भूमिका कायम ठेवली.

चर्चा...
पुन्हा बैठकांचे दौर सुरु झाले. एका बाजूला आम्ही भाजपासोबत जात असल्याचे आक्षेप घेता आणि दुसरीकडे तुम्हीच भाजपासोबत हातमिळवणी करता. हा सरळसरळ विश्वासघात आहे, असे तटकरे यांनी ऐकवले. तर यातून योग्य मार्ग काढू, झालेली चूक दुरुस्त केली जाईल, असे खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

चर्चा...
पुन्हा बैठकांचे दौर सुरु झाले. एका बाजूला आम्ही भाजपासोबत जात असल्याचे आक्षेप घेता आणि दुसरीकडे तुम्हीच भाजपासोबत हातमिळवणी करता. हा सरळसरळ विश्वासघात आहे, असे तटकरे यांनी ऐकवले. तर यातून योग्य मार्ग काढू, झालेली चूक दुरुस्त केली जाईल, असे खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शेवटी झाल्या प्रकाराचा अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवला जाईल, आ. गोपाळ अग्रवाल यांना जाब विचारला जाईल. निरीक्षकांचा अहवाल मागवून पुढील कारवाई केली जाईल असे काँग्रेसने मान्य केले आणि दोन्ही काँग्रेस विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले.

Web Title: Congress-NCP jointly joined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.