काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका
By admin | Published: February 24, 2017 05:09 AM2017-02-24T05:09:09+5:302017-02-24T05:09:09+5:30
सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीने ४९ जागा जिंकत
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीने ४९ जागा जिंकत मुसंडी मारली. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला ‘पुलोद’ने बाजी मारल्यानंतर आता दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. या दोन्ही पक्षांची अवस्थाही फारशी चांगली राहिलेली नाही. या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एआयएमआयएम’ने ९ जागा जिंकत ‘इंद्रभुवना’त लक्षवेधी प्रवेश केला आहे.
महापालिकेत सत्तेसाठी ५२ ही मॅजिक फिगर आहे; भाजपा सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली; पण समविचारी पक्ष म्हणून शिवसेनेला मैत्रीचा हात द्यावा लागणार आहे. आता सेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
भाजपाने सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले. शिवसेनेबरोबर युती नसल्यामुळे मतांची विभागणी होईल, ही भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक सभेनंतर नाहीशी झाली. माजी महापौर महेश कोठे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या शक्तीनुसार प्रदर्शन करीत २१ जागा जिंकल्या. काँग्रेसची कामगिरी अतिशय खराब झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी परिश्रमपूर्वक प्रचार केला खरा; पण मतदारांनी डावलले. राष्ट्रवादीला तर अस्तित्वासाठी झगडावे लागले. केवळ ४ जागा पदरात पडल्या.
सोलापूर
पक्षजागा
भाजपा४९
शिवसेना२१
काँग्रेस१४
राष्ट्रवादी0४
इतर१४