आघाडीबाबत काँग्रेस -राष्ट्रवादीची बोलणी सकारात्मक - ठाकरे
By admin | Published: January 24, 2017 07:22 PM2017-01-24T19:22:33+5:302017-01-24T19:22:33+5:30
अकोला : अकोला महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा विचार सुरू आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
अकोला : अकोला महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा विचार सुरू आहे. बोलणी सकारात्मक झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांसाठी आघाडी अनुकूल आहे. वरिष्ठांच्या चर्चेनंतर स्थानिक नेत्यांनाच यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
ठाकरे रविवारी अकोल्यात आले त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
जळगाव जामोद येथील एका कार्यक्रमातून ते यवतमाळकडे जात असताना त्यांनी अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासोबत महापालिका निवडणुकीसंदर्भात विस्तृत चर्चा केली.
त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसची रणनीतीत अनेक बदल केले जात आहेत.
अकोल्यात राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील प्रस्तावावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी विस्तृत संवाद साधला. यावेळी काँग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार नतिकोद्दीन खतीब, रमाकांत खेतान, मदन भरगड, साजिद खान, डॉ. सुधीर ढोणे, अविनाश देशमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.