शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव - मुख्यमंत्री

By admin | Published: June 1, 2017 05:19 PM2017-06-01T17:19:39+5:302017-06-01T18:05:25+5:30

शेतकरी संपावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केलं आहे

Congress-NCP Violence Against Farmers' Strike - Chief Minister | शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव - मुख्यमंत्री

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव - मुख्यमंत्री

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - शेतकरी संपावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केलं आहे. शेतकरी संपाच्या नावे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा डाव केला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांशी संघर्ष व्हावा, गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट केलं. (वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलं 155 लिटर दूध)
गेल्या सरकारच्या तुलनेत या सरकाने शेतकऱ्यासाठी सकारात्मक काम केली आहेत. काही लोक शेतकऱ्यांना भडकवण्याचा पयत्न करत आहेत.संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही अशी लोक शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि दूध अडवत आहे असे सूचक विधान करत त्यांनी संपासासाठी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बँकरसोबतच्या बैठकीत खरीपाच्या पीककर्जावर चर्चा केली आहे. दूध संघ 25 रुपयांनी दूध खरेदी करतात, मुंबईत तेच दूध 60 रुपयांनी विकतात, दुधाचे भाव 4 रुपयांनी वाढले आणि ते आणखी वाढले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दूधाला भाव देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
 (VIDEO :शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना व्यापा-यांची मारहाण)  
सरसकट कर्जमाफी करणं कुठल्याही सरकारला शक्य नाही. कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक विचार सुरु आहे. बँकरसोबतच्या बैठकीत खरीपाच्या पीककर्जावर चर्चा झाली आहे.  सातत्याने दुष्कळ असून कृषीचा विकासदर साडे बारा टक्क्याने वाढला आहे. पुढचे 2 ते 3 वर्षे विकासदर ठेऊ शकलो तर शेतकऱ्याला निश्चित फायदा होईल. उत्पादकतेत महाराष्ट्र खाली असल्याने हमी भाव परवडत नाही, त्यामुळे उत्पादकता वाढवण्याचं काम आम्ही करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले. 
 (राज्यकर्त्यांनी शेतक-यांसाठी शहाणपणाचा निर्णय लवकर घ्यावा - शरद पवार)
 
जे संप करतायेत त्यांना आवाहन करतो की राज्य सरकारसोबत काम करावं, त्यांची मदत आणि सल्ले आम्ही घेऊ इच्छितो अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी शेतकऱ्यांना केली.
 
 (VIDEO : शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड)     
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे - 
 
- हमीभावापेक्षा कमी भाव देणं कायदेशीर गुन्हा ठरेल अशी तरतूद आणण्यासाठी जुलै महिन्यात अधिवेशनात प्रस्ताव मांडणार आहोत
- स्वामीनाथन आयोग लागू केल्यास किती फायदा होईल याचा विचार करणं गरजेचं, आपली उत्पादन क्षमता कमी असल्याने आयोग लागू करणं सोपं नाही
- सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले
-डाळींचे भाव, शेतमालाचे भाव गेल्या सरकरच्या तुलनेत अधिक आहेत
- दुधाचे भाव 4 रुपयांनी वाढले आणि ते आणखी वाढले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील
- दगडफेक करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्यामागे काही राजकीय लोक आहेत
-15 जूनपर्यंत तूरखरेदीला वाढ द्यावी, अशी केंद्राला विनंती केलीय
- संप जास्त काळ चालू ठेवणे शेतक-यांच्या हिताचं नाही, यामध्ये त्यांचंच नुकसान- नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही राज्य सरकार निश्चितच विचार करेलरे चे नवीन ब्रँड आम्ही आणतोय जे मार्केटमध्ये येतील 
- जाणीवपूर्वक शेतक-यांच्या आडून काँग्रेस - राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव 
- दुधाला योग्य भाव देण्याची जबाबदारी दूध संघांची 
- पोलिसांशी संघर्ष व्हावा, गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत आहेत -
- शेतकरी संपाबाबत शेतकरी नेत्यासंबोत वारंवार चर्चा सुरु 
- बँकरसोबतच्या बैठकीत खरीपाच्या पीककर्जावर चर्चा 
 

- संप मागे घ्या आणि चर्चेसाठी या - सदाभाऊ खोत 

शेतकऱ्यांसोबत आम्ही मार्ग काढू. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. सगळ्यांनी चर्चेसाठी यावं. त्यामधून तोडगा काढू, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत म्हणाले की,  शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत संपर्कात आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दिलासा देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्ते, शेतकरी नेते यांच्यासोबत चर्चेसाठी आजही सरकारची दारं उघडी आहेत. शेतकऱ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत चर्चेला यावं. चर्चेतून निश्चित तोडगा निघेल.

 
आजपर्यंतच्या इतिहासात शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती, मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोेष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली.
 
शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करुन योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार या संपाबाबत आत्मपरीक्षण करेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत पंकजा पुढेही असे म्हणाल्या की शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला आधार दिला पाहिजे.
 
कर्जमाफी मिळत नसल्यानं शेतक-यांनी शेतीमाल रस्त्यांवर ओतून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. पश्चिम महाराष्ट्रतील महत्त्वाची बाजार पेठ असलेल्या पुण्यातील मार्केटयार्डमध्ये आज 40 टक्के आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्रास सहन करावा लागणार आहे
 

Web Title: Congress-NCP Violence Against Farmers' Strike - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.