काँग्रेस, राष्ट्रवादीचा रेल रोको
By admin | Published: June 25, 2014 11:28 PM2014-06-25T23:28:53+5:302014-06-25T23:28:53+5:30
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज रेल रोको आंदोलन केले.
Next
>नवी मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज रेल रोको आंदोलन केले. भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध करीत संपूर्ण भाडेवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलनकत्र्यानी केली. 28 जूनर्पयत ही भाडेवाढ रद्द न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ऐरोली रेल्वे स्थानकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख दिनेश पारेख, महापालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जयेश कोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कमल पाटील तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक आणि रहिवासी सहभागी झाले होते. ठाण्याहून नेरूळला जाणा:या लोकलसमोर भाडेवाढीचा निषेध करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तब्बल वीस मिनिटे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांनी आंदोलनकत्र्याना संबोधित केले. भाडेवाढीच्या विरोधात लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून सरकारने ही भाडेवाढ अंशत: कमी केली आहे. मात्र प्रथम वर्गाने प्रवास करणा:या प्रवाशांच्या आणि लांब पल्ल्यांच्या प्रवासी भाडय़ात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही संपूर्ण भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वाशी स्थानकात काँग्रेसच्यावतीने रेल रोको करीत भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वाशी स्थानकातून अंधेरीला जाणा:या सकाळी 7.28 च्या लोकलसमोर हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने केलेली विक्रमी भाडेवाढ शंभर टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकत्र्याकडून करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा नवी मुंबई काँग्रेसच्या सहप्रभारी छाया आजगांवकर तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश नायडू, ठाणो लोकसभा युवक अध्यक्ष निशांत भगत आणि वाशी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या घणसोली-कोपरखैरणो कमिटीच्या वतीने घणसोली स्थानकात आंदोलन करण्यात आले. स्थानिक नगरसेविका शोभा पाटील यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष बन्सी डोके, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक पाटील, देवस्थान संस्थेचे रोहिदास पाटील, दीनानाथ पाटील, दमयंती म्हात्रे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)