पहिल्याच दिवशी काँग्रेसचा मोर्चा

By admin | Published: December 7, 2014 01:15 AM2014-12-07T01:15:49+5:302014-12-07T01:15:49+5:30

राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांना रोखण्याच्या मागणीसाठी 8 डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर काँग्रेस पक्षाचा हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे.

The Congress Party on the very first day | पहिल्याच दिवशी काँग्रेसचा मोर्चा

पहिल्याच दिवशी काँग्रेसचा मोर्चा

Next
नागपूर विधान भवन : शेतकरी आर्थिक पॅकेज, दलित अत्याचाराचा विषय पेटणार
मुंबई : नैसर्गिक संकटांनी कोलमडून पडलेल्या  शेतक:यांना आर्थिक पॅकेज देण्याच्या व राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांना रोखण्याच्या मागणीसाठी 8 डिसेंबर  रोजी नागपूर विधान भवनावर काँग्रेस पक्षाचा  हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यासंदर्भात अद्याप कार्यवाही न केल्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता दीक्षाभूमीवरून मोर्चा काढला जाईल. मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे व विधानसभेतील गटनेते आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या मोर्चाची जबाबदारी मुख्य संयोजक म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात त्यांनी नागपूर येथे बैठक आयोजित केली होती. 
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी, रामकिसन ओझा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसने कर्जमाफी योजना, कापसाला 5 हजार 5क्क् ते 6 हजार रुपयांचा भाव, सोयाबीन व धान उत्पादक तसेच बागायतदारांना नुकसानभरपाई, ऊस उत्पादकांना योग्य भाव आदी मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांसह राज्यातील दलित अत्याचारांना आळा घालण्याच्या मागणीसाठी निघणा:या हल्लाबोल मोर्चामध्ये शेतकरी व कार्यकत्र्यानी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
 
च्विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबाबतच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यस्तरीय शिस्तभंग कारवाई समितीची पहिली बैठक टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती.
 
च्बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष माजी खासदार गेव्ह आवारी होते. बैठकीला समितीचे सदस्य माजी मंत्री रविशेठ पाटील, प्रदेश सरचिटणीस अॅड. महादेव शेलार, लातूरचे माजी अध्यक्ष त्र्यंबक झंवर आणि समन्वयक अॅड. गणोश पाटील उपस्थित होते.
च्समितीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यासंदर्भात प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या तक्रारींवर विचारविनिमय झाला. समितीचे दुसरी बैठक 13 डिसेंबर रोजी टिळक भवनात होणार आहे. या बैठकीला अनेक पदाधिका:यांना त्यांचे म्हणणो मांडण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
 
गुप्ता व देशमुख मीडिया पॅनेलवर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ काँग्रेस नेते भुपिंदरसिंग गुप्ता आणि प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अभिजित देशमुख यांची राज्यस्तरीय मीडिया पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रदेश काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी हे पॅनेल स्थापन करण्यात आले होते. या व्यतिरिक्त प्रदेश चिटणीस रामकिसन ओझा व संजय दुबे यांची नागपूर विभागीय मीडिया पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
अधिवेशनावर 15 रोजी मोर्चा 
कोल्हापूर : शासनाने 3क् ऑक्टोबर 2क्13 रोजी विद्यार्थी पटसंख्येवर आधारित शिक्षकेतर कर्मचा:यांसाठी आकृतिबंध लागू केला. त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचारी अतिरिक्त होत आहेत. अतिरिक्त कर्मचा:यांचे पगारही ऑफलाइन पद्धतीने काढण्याचा आदेश 14 ऑक्टोबर 2क्14 रोजी शासनाने काढला आहे. या आदेशाविरोधात 15 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

Web Title: The Congress Party on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.