घटनेच्या संरक्षणाची काँग्रेसची शपथ

By Admin | Published: February 11, 2017 01:54 AM2017-02-11T01:54:41+5:302017-02-11T01:54:41+5:30

केंद्रातील व राज्यातील सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून राज्यघटनेची पायमल्ली सुरू आहे. त्यांना घटना मोडीत काढायची आहे

Congress pledge to protect the incident | घटनेच्या संरक्षणाची काँग्रेसची शपथ

घटनेच्या संरक्षणाची काँग्रेसची शपथ

googlenewsNext

पुणे : केंद्रातील व राज्यातील सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून राज्यघटनेची पायमल्ली सुरू आहे. त्यांना घटना मोडीत काढायची आहे. घटनेचे संरक्षण करण्याचा निर्धार करूनच काँग्रेसचे उमेदवार यापुढे प्रत्येक निवडणुक लढवतील असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
महापालिका निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी गुरूवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे घटनेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress pledge to protect the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.