काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: September 28, 2014 01:01 AM2014-09-28T01:01:34+5:302014-09-28T01:01:34+5:30
निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी काँग्रेसने आपल्या शक्तीचे दर्शन घडविले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहरातील उमेदवार नितीन राऊत (उत्तर),
मिरवणूक : हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवार पोहोचले अर्ज भरायला
नागपूर : निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी काँग्रेसने आपल्या शक्तीचे दर्शन घडविले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहरातील उमेदवार नितीन राऊत (उत्तर), विकास ठाकरे (पश्चिम), सतीश चतुर्वेदी (दक्षिण), अनिस अहमद (मध्य), प्रफुल्ल गुडधे पाटील (दक्षिण-पश्चिम) आणि अभिजित वंजारी (पूर्व) हे एका खुल्या जीपवर एकत्रच भव्य मिरवणुकीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचले.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काँग्रेससोबतच शिवसेना व इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांची सुद्धा आपापल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज सादर केले. परंतु सर्वाधिक लक्ष वेधले ते काँग्रेसच्या मिरवणुकीने. या मिरवणुकीला संविधान चौक येथून सुरुवात झाली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. त्यानंतर एका खुल्या जीपवर विलास मुत्तेमवारांसह सर्व उमेदवार स्वार झाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. काँग्रेसने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते. झेंडे, टोप्या आणि उमेदवारांचे मुखवटे घालून कार्यकर्ते आले होते. मिरवणुकीतील बँड पथकाने आपल्या सादरीकरणाद्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविलाच परंतु नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.
पोलिसांना धक्काबुक्की
काँग्रेसच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा लोंढाच जिल्हाधिकारी कार्यालयात शिरू लागला. तेव्हा गेटवरील पोलिसांना रोखणे कठीण गेले. काही पोलिसांना थोडीशी धक्काबुक्कीही झाली. बॅरिकेट्ससुद्धा कार्यकर्त्यांना रोखण्यास असमर्थ ठरले.
शिवसेना, मनसेनेही दाखविली शक्ती
शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव (दक्षिण) आणि अजय दलाल (पूर्व) यांनी सुद्धा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवार मिरवणुकीद्वारे अर्ज सादर करण्यासाठी पोहोचले. लाल फेटा बांधून असलेले पांडव लक्ष वेधून घेत होते. मनसेचे रितेश मेश्राम (उत्तर नागपूर)चे उमेदवार यांनी सुद्धा मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले.
कार्यकर्त्यांमध्ये नारेबाजीची स्पर्धा
काँग्रेसचे उमेदवार हे प्रथम उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आले होते. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार अर्ज सादर करायला आले. दोन्ही पक्षाचे उमेदवार हे अर्ज सादर करण्यासाठी आत गेले. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते हे बाहेरच प्रतीक्षा करीत होते. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी हे अर्ज सादर करून बाहेर पडत असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जय भवानीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वारे पंजाचा आवाज बुलंद केला. काही वेळ दोन्ही बाजूंनी नारेबाजी सारखी सुरूहोती.