पेट्रोल व डिझेल भाववाढ विरोधात काँग्रेसची निदर्शने

By admin | Published: June 2, 2016 02:47 PM2016-06-02T14:47:44+5:302016-06-02T14:50:12+5:30

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणा-या भाववाढीच्या विरोधात लोकसभा युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने सोलापूरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली़

Congress' protest against petrol and diesel prices | पेट्रोल व डिझेल भाववाढ विरोधात काँग्रेसची निदर्शने

पेट्रोल व डिझेल भाववाढ विरोधात काँग्रेसची निदर्शने

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ०२ -  पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणा-या भाववाढीच्या विरोधात लोकसभा युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली़. मोदी सरकारचा धिक्कार असो़, मोदी सरकार धोकेबाज सरकार अशा विविध घोषणा देत काळे झेंडे दाखविण्यात आले़ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे भाव अत्यंत कमी झाले असताना सुध्दा भाजपप्रणित मोदी सरकारने सतत पेट्रोल व डिझेलची भाववाढ केली़ ही भाववाढ अन्यायकारक आहे़ सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू व १०० दिवसात परदेशातील काळा पैसा परत आणू म्हणणारे भाजप सरकार धोकेबाज सरकार आहे़  गरीबाचे सरकार आहे असे म्हणणारे भाजप सरकार गरीबांच्या जिवावर उठले आहे़ दुष्काळी परिस्थितीत अद्यापपर्यंत कोणतीच मदत दिली नाही़ उलट शेतकºयांना संपविण्याचे प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यावेळी केला़
या आंदोलनात आ़ प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे, बाबा करगुळे, शालेय शिक्षण समितीचे सभापती संकेत पिसे, तिरूपती परकीपंडला, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, केदार उंबरजे, स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी आदी काँग्रेस नेते उपस्थित होते़

Web Title: Congress' protest against petrol and diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.