मुंबईत काँग्रेसला धक्का, हेगडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

By admin | Published: January 23, 2017 12:06 PM2017-01-23T12:06:12+5:302017-01-23T12:06:12+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे

Congress push in Mumbai, Hedghede join BJP | मुंबईत काँग्रेसला धक्का, हेगडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबईत काँग्रेसला धक्का, हेगडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात दाखल झाले. हेगडे यांच्यासह बॉलिवूड अभिनेते दलिप ताहिल यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये इतर पक्षांचे नेते दाखल होतं आहेत.

भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर हेगडे यांनी मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होतो. तसेच त्यांच्या एकाधिकाराला कंटाळून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितले.

सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी अशी कृष्णा हेगडे यांची ओळख आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते आमदार होते. २०१४ च्या निवडणुकीत हेगडे यांचा भाजपचे पराग आळवणी यांनी पराभव केला होता. हेगडे भाजपात दाखल झाल्याने मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे.

Web Title: Congress push in Mumbai, Hedghede join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.