पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार - नारायण राणेंचा 'प्रहार'
By admin | Published: April 16, 2015 10:00 AM2015-04-16T10:00:34+5:302015-04-16T10:16:47+5:30
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगत नारायण राणेंनी स्वपक्षावरच 'प्रहार' केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगत नारायण राणेंनी स्वपक्षावरच 'प्रहार' केला आहे. काँग्रेसचे अनेक नेते हे फक्त चेहरे दाखवपण्यापुरते समोर होते. काळोख पडल्यावर अनेकांनी अनेक उद्योग केले व त्यामुळे राणे लढले, काँग्रेस हरली अशी स्थिती झाली असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
वांद्रे पूर्व निवडणुकीतील पराभवासंदर्भात गुरुवारी नारायण राणेंच्या प्रहार या दैनिकाने पराभवाचा विश्लेषण करणारा अग्रलेख लिहीला आहे. या लेखातून नारायण राणेंनी पराभवासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाच जबाबदार ठरवले. राणेंसारखा आक्रमक व खंदा नेता विधानसभेत पोहोचू नये असे विरोधकांना वाटणे साहजिक आहे. पण यात स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही हेच वाटते होते. प्रचारफेरीच्या जीपमध्ये काँग्रेस एकत्र दिसत होता. पण काळोखात अनेकांनी अनेक उद्योग केले असे नारायण राणेंनी म्हटले आहे. वांद्य्रातील पराभव हा नारायण राणेंचा नसून काँग्रेसचा आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून नारायण राणेंचा रोख काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर होता याविषयी चर्चा रंगू लागली आहे.