"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा"; काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:07 PM2021-05-14T14:07:39+5:302021-05-14T14:12:06+5:30

Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सप्रमाणे मागील आठवड्यात नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे.

Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government over pm cares fund ventilators | "पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा"; काँग्रेसची मागणी 

"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा"; काँग्रेसची मागणी 

googlenewsNext

मुंबई - पीएमकेअर फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्सही पूर्णतः निरुपयोगी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला आढळले आहे. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा असून केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी केली आहे. 

सचिन सावंत म्हणाले की, पीएम केअर फंडाच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा अक्षम्य आहे. मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडले. या फंडाबाबत माहितीही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसे आणि का मिळाले हे जनतेला समजलेच पाहिजे. मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा पण नफेखोरीचा विचार करणेही अमानुष आहे. 

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सप्रमाणे मागील आठवड्यात नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे. पीएम केअर फंडातून नाशिक महानगरपालिकेला केंद्र शासनाने व्हेंटीलेटर्स पुरवल्याचा भाजपकडून मोठा गाजावाजा केला होता परंतु तब्बल ६० व्हेंटिलेटर्स अर्धवट स्थितीत होते, त्याचे सुटे भाग न मिळाल्यामुळे इन्स्टॉलेशन थांबले तसेच जून महिन्यात पीएम केअर फंडातून पाठविण्यात आलेल्या ३५ व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरूस्त असून संबंधित कंपनीकडून या यंत्राचे सुटे भाग प्राप्त न झाल्याने हे व्हेंटिलेटर्स वापराविना पडून आहेत. 

नाशिक, औरंगाबादप्रमाणे राज्यातील इतर रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्याबाबतीही अशाच तक्रारी आल्या आहेत. मोदी सरकारने हा जनतेच्या जीवाशी खेळ चालवला आहे. मोदी सरकारच्या मनमानी कारभारामुळे कोरोना महामारीत ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्सअभावी हजारो लोकांचे जीव गेले परंतु त्यातून मोदी सरकारने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. देशातील जनतेला रामभरोसे सोडण्यात आल्याचे एकंदर चित्र दिसत आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title: Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government over pm cares fund ventilators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.