काँग्रेस-शिवसेनेची युती!

By Admin | Published: June 15, 2017 01:58 AM2017-06-15T01:58:48+5:302017-06-15T01:58:48+5:30

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना व विरोधी पक्ष काँग्रेसने मालेगावात युती करत महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेसचे रशीद शेख महापौरपदी, तर

Congress-Shiv Sena coalition! | काँग्रेस-शिवसेनेची युती!

काँग्रेस-शिवसेनेची युती!

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (नाशिक) : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना व विरोधी पक्ष काँग्रेसने मालेगावात युती करत महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेसचे रशीद शेख महापौरपदी, तर शिवसेनेचे सखाराम घोडके यांची उपमहापौरपदी निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल आघाडीचे नबी अहमद अहमदुल्ला व मन्सुर अहमद यांचा पराभव झाला. महापौर निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल आघाडीला पाठिंबा दिला. भाजपाचे दोन नगरसेवक गैरहजर होते. एमआयएमने तटस्थ भूमिका स्वीकारली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपा व एमआयएम तटस्थ राहिले.
हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौरपदासाठी शेख यांना काँग्रेसचे २८ व शिवसेनेच्या १३ अशा ४१ नगरसेवकांनी मतदान केले. एमआयएमचे ७ नगरसेवक तटस्थ राहिले. नबी अहमद यांना राष्ट्रवादी-जनता दल आघाडीचे २७ व भाजपाच्या ७ अशा ३४ नगरसेवकांनी मतदान केले.
उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे घोडके यांना काँग्रेसची २८ व शिवसेनेची १३ अशी ४१ मते मिळाली. आघाडीचे मन्सुर अहमद यांना २७ मते मिळाली. भाजपा व एमआयएमचे प्रत्येकी ७ असे १४ नगरसेवक तटस्थ राहिले. काँग्रेस-शिवसेना युतीमुळे सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत़

सेनेला पहिल्यांदाच उपमहापौरपद
महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला आजपर्यंत उपमहापौरपद मिळाले नव्हते. सखाराम घोडके यांच्या रूपाने पहिल्यांदाच ही संधी मिळाली. शिवसेना व काँग्रेसने युती करून सत्ता मिळविली.

Web Title: Congress-Shiv Sena coalition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.