"फडणवीसजी, ...तर महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल" - काँग्रेसचा सल्ला
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 28, 2020 04:47 PM2020-09-28T16:47:18+5:302020-09-28T16:51:03+5:30
पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे, तसेच हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भात भाष्य करणारे, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आहे. आता ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूसोबत दिसणार आहेत. पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे.
सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल."
ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी
सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे. ते आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यांच्याकडून हे नाकारले जात होते. पण आता जदयूत प्रवेश केल्याने ते निवडणूक लढतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वीही गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत -
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांकडून पटनामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्या आदेशानंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी या पथकातील आयपीएस विनय तिवारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता. तसेच सुशांत प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करावे यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केले.
SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट
गृहमंत्री अनिल देशमुखांनीही गुप्तेश्वर पांडे यांच्यावर साधला होता निशाणा -
बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते असा टोला त्यांनी लगावला होता.
आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट