भाजपाला सत्तेतून खाली खेचा, काँग्रेसला आणा; नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:46 PM2023-09-11T16:46:29+5:302023-09-11T16:46:45+5:30

आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजपा पाठ थोपटून घेतात असा आरोप त्यांनी केला.

Congress state president Nana Patole's criticism of BJP | भाजपाला सत्तेतून खाली खेचा, काँग्रेसला आणा; नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात

भाजपाला सत्तेतून खाली खेचा, काँग्रेसला आणा; नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात

googlenewsNext

गोंदिया - केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी आहे असा घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

जनसंवाद यात्रेच्या ९ व्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा गोदिंया व भंडारा जिल्ह्यात पोहचली. तिरोडा येथील सभेत नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी जे बोलतात नेमके त्याच्या उलटे करतात. शेतीचा खर्च कमी करून शेतमालाला दुप्पट भाव देतो असे म्हणाले होते पण प्रत्यक्षात शेतीचा खर्च प्रचंड वाढवला व शेतमालाचा भाव मात्र कमी केला. पेट्रोल, डिझेलवर शेतकऱ्यांच्या नावाने ४ रुपये कृषी कर घेतात आणि या कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये मोदी सरकार लुटते. वर्षभरात एका शेतकऱ्याकडून जवळपास १ लाख रुपये या कराच्या रुपाने लुटतात आणि शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली फक्त ६ हजार रुपये देतात. आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजपा पाठ थोपटून घेतात असा आरोप त्यांनी केला.

तसेच लोकशाहीमध्ये लोकांचे ऐकायचे असते पण आता ‘मी’ आहे जेथे ‘मी’पणा येतो तेथे ‘आम्ही’ संपते. म्हणूनच आता ‘मन की बात’ होत आहे. देशात फक्त ‘मन की बात’ सुरु आहे, मोदी सरकार जनतेला विचारत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व लोकशाही संपवण्याचे काम रोज सुरु आहे, शेतकरी रोज मरतो आहे, तरुणांना रोजगार नाही, महागाईबद्दल सरकार बोलत नाही. निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत, ओबीसी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. तलाठी भरतीतून तरुणांना कोट्यवधी रुपयांना सरकारने लुटले. देशातील व राज्यातील भाजपाचे हे सरकार जनतेच्या मुद्द्यावर लक्षच देत नाही. म्हणून जनतेच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहेत. ही लढाई आपण एकत्र मिळून लढू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी काँग्रेस लढत आहे. केंद्रातील व राज्यातील अन्यायी, अत्याचारी भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा व काँग्रेसला सत्तेत आणा, तुम्हाला न्याय देण्याचे काम करेन, असा विश्वास पटोले यांनी दिला.

Web Title: Congress state president Nana Patole's criticism of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.