काँग्रेस पक्षश्रेष्ठी राणेंच्या संपर्कात!
By admin | Published: March 29, 2017 03:25 AM2017-03-29T03:25:09+5:302017-03-29T03:25:09+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत दिल्लीत जोरदार चर्चा असली तरी आम्ही काँग्रेसमध्येच
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत दिल्लीत जोरदार चर्चा असली तरी आम्ही काँग्रेसमध्येच असून पक्षश्रेष्ठी संपर्कात आहेत, असे स्पष्टीकरण आ. नितेश राणे यांनी दिले आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असून त्यांनी दिल्लीत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ते खासगी कामासाठी दिल्लीला गेले होते. कोणत्याही राजकीय नेत्याला भेटलेले नाहीत. विनाकारण आमच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार केले जाते आहे, असे आ. नितेश यांनी म्हटले आहे. मी उद्या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहे. राणे साहेब सहभागी होणार नाहीत. कारण विधान परिषदेत विरोधी पक्षांचे नेते आवाज उठवतील आणि विधानसभेचे आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होतील ही व्यूहरचना आधीच ठरलेली आहे. आज आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, भविष्यात काय होईल यासाठी ज्योतिषी शोधावा लागेल. काँग्रेस सोडण्याचा विचार नाही. पक्ष मजबूत व्हावा यासाठी बोलत आहोत. जे बोलत नाहीत त्यांना पक्षाच्या भवितव्याची चिंता नसावी, असे आ. राणे यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)