गोवंश हत्याबंदीचे काँग्रेसने केले स्वागत

By admin | Published: March 4, 2015 02:46 AM2015-03-04T02:46:13+5:302015-03-04T02:46:13+5:30

राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे, तर राष्ट्रवादीने त्यास विरोध दर्शविला आहे. बॉलीवूडमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Congress welcomed cow slaughter | गोवंश हत्याबंदीचे काँग्रेसने केले स्वागत

गोवंश हत्याबंदीचे काँग्रेसने केले स्वागत

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध : बॉलीवूड जगतातही उमटले पडसाद
मुंबई : राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे, तर राष्ट्रवादीने त्यास विरोध दर्शविला आहे. बॉलीवूडमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, या निर्णयाचे काँग्रेस स्वागत करते; मात्र समर्थन गोळा करण्यासाठी या मुद्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करता कामा नये. या कायद्याची अंमलबजावणी पूर्णत: पारदर्शक असली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, भाजप या मुद्यावर जनतेची दिशाभूल करीत आहे. समाजाच्या एका घटकाला खुश करण्यासाठी राज्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना सर्वांत जास्त फटका बसणार आहे. अशा प्राण्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी एका महिन्याला किमान ५,००० रुपये खर्च करतात. आता अशा प्राण्यांना जगवण्याची जबाबदारी उचलण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे. गरीब शेतकऱ्यांना यापूर्वी पर्याय उपलब्ध होता; पण आता तो नाही.
बॉलीवूडमधील फरहान अख्तर, आयुष्मान खुराणा आणि रिचा चढ्ढा यांनी हा निर्णय म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असे म्हटले आहे. मी काय खावे, हे सरकार मला सांगू शकत नाही, असे दिग्दर्शक ओनीर यांनी टिष्ट्वट केले आहे. रिचा म्हणाली, मी शाकाहारी आहे. गोवंश हत्याबंदी करणे हे तर जातीय राजकारण झाले.

सरकारने गोवंशाबरोबरच दातांवरही बंदी घालावी. आम्ही भाज्यांवर जगू. किमान त्यामुळे तरी तुम्ही राजकारणी विद्वेष पसरवणारी वक्तव्ये करणार नाहीत.
- वीर दास, विनोदी अभिनेता
महाराष्ट्रात महिला, दलितांपेक्षा गायी सुरक्षित आहेत. या दोहोंपेक्षा गाय झालेले बरे. - सलमान रश्दी, लेखक

टिष्ट्वटरवर टिकेची झोड
सो नाऊ इन महाराष्ट्रा यू कॅन हॅव अ बीफ विथ समवन बट यू कान्ट हॅव बीफ विथ समवन. - फरहान
गायींना पुढील निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.
- शिरीष कुंदेर, दिग्दर्शक

बीफ फाल बाद कमिने.
- आयुष्मान खुराणा
अन्नावर बंदी घालणे थांबवा आणि बँकांतून पैसे काढण्यावरही
बंदी घाला.
- रणवीर शौरी, अभिनेता

Web Title: Congress welcomed cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.