काॅंग्रेस १८ जागा लढविणार; मविआ आज काढणार ताेडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:27 AM2024-03-21T05:27:07+5:302024-03-21T07:03:47+5:30
Lok Sabha Election 2024: ज्या ३ जागांवरून घोडे अडले होते, त्यापैकी सांगली, भिवंडीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे समजते.
महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक गुरुवारी मुंबईत होत असतानाच १८ जागा लढवण्यावर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून त्यातील काही नावेही बाहेर आली आहेत.
गुरुवारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी मविआची बैठक होत असून यावेळी पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलावण्यात येणार आहे की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ते सोबत आले नाहीत तर कोणाला उमेदवारी द्यायची, याबद्दलही काँग्रेसने चर्चा केली आहे. ज्या ३ जागांवरून घोडे अडले होते, त्यापैकी सांगली, भिवंडीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे समजते.
हे आहेत संभाव्य उमेदवार
गडचिराेली नामदेव किरसान
चंद्रपूर विजय वडेट्टीवार
नागपूर विकास ठाकरे
रामटेक रश्मी बर्वे
अमरावती बळवंत वानखेडे
अकोला प्रकाश आंबेडकर
अथवा अभय पाटील
काेल्हापूर छत्रपती शाहू महाराज
सोलापूर प्रणिती शिंदे
पुणे रवींद्र धंगेकर
नांदेड वसंत चव्हाण
लातूर शिवाजी काळगे
नंदुरबार गोवाल पाडवी
भंडारा-गोंदिया नाना पटोले
भिवंडी दयानंद चोरगे
सांगली विशाल पाटील