राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

By admin | Published: January 11, 2016 06:49 PM2016-01-11T18:49:30+5:302016-01-11T18:49:30+5:30

राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Congress's betting in the Nagar Panchayat elections in the state | राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक पातळीवर कॉंग्रेसचं वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील १७ नगर पंचायत निवडणुकींमध्ये २८९ पैकी कॉंग्रेसने सर्वाधिक १०७ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर राष्ट्रवादी ५८ जागा, शिवसेना ५५ जाग्यावर तर भाजप २४ जागांवर विजयी झाले आहेत.
आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत चागंले यश मिळवल्याच चित्र आहे. राज्यातील १७ नगर पंचायतीपैकी नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हिमायतनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदूरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या ७ नगर पंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत पटकावले.
या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले असून, संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
खा. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्रात आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक १०७ जागा जिंकल्याची माहिती दिली. त्यावर कॉंग्रेस अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Congress's betting in the Nagar Panchayat elections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.