काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू

By admin | Published: July 9, 2014 02:04 AM2014-07-09T02:04:11+5:302014-07-09T02:04:11+5:30

प्रदेश काँग्रेसनेदेखील 206 विधानसभा मतदारसंघातील तीन संभाव्य उमेदवारांची नावे समन्वयांमार्फत मागवून लढाईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

The Congress's strong march continues | काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू

काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू

Next
यदु जोशी - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा चालविली असताना दुसरीकडे प्रदेश काँग्रेसनेदेखील 206 विधानसभा मतदारसंघातील तीन संभाव्य  उमेदवारांची नावे समन्वयांमार्फत मागवून लढाईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या राज्यभर निर्धार मेळावे घेत असल्यामुळे काँग्रेसनेदेखील आपली तयारी सुरू केली आहे.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार आहेत.  सध्या काँग्रेस नेत्यांच्या विभागीय बैठका होत आहेत. विधानसभा निवडणुकीला नव्या उमेदीने सामोरे जाण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष  ठाकरे यांनी सांगितले. राज्यात काँग्रेसचे 82 आमदार आहेत. जिथे पक्षाचा आमदार नाही असा 2क्6 मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी काँग्रेसने सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी एकेक समन्वयक नेमण्यात आला आहे. या समन्वयकांकडून त्या मतदारसंघांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या 82 मतदारसंघांमधून माहिती मागवण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली जाणार आहे. राष्ट्रवादीने उद्या आघाडी तोडलीच तर त्यादृष्टीने तयारी असली पाहिजे, त्यासाठी ही पूर्वतयारी असल्याचे पक्षाच्या सूत्रंनी सांगितले.

 

Web Title: The Congress's strong march continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.