दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडणार; पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करू या - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 06:47 AM2021-09-25T06:47:31+5:302021-09-25T06:49:03+5:30

सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही.

To connect Delhi directly to Nariman Point; Let's reduce the use of petrol and diesel says Nitin Gadkari | दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडणार; पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करू या - नितीन गडकरी

दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडणार; पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करू या - नितीन गडकरी

Next

पुणे : मला देशात पेट्रोल व डिझेलचा वापर बंद करायचा आहे. इथेनॉलचा वापर वाढायला हवा. रशियात इथेनॉलवर वाहने धावण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातही रिक्षा व दुचाकी इथेनॉलवर धावू शकते. सर्वच कार उत्पादकांना फ्लेक्स इंजिनची निर्मिती करण्यास सांगितले आहे. त्यामुळे १०० टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारची निर्मिती भारतात होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणले.

सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही. पैसा कसा उभा करायचा, ही समस्या नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय झाला, तर दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडून देण्याचे काम मी करून देईन,”.

दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेसचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तेथील रस्त्यावर १७० किमी वेगाने धावणाऱ्या गाडीत बसलो होतो ; पण पोटातील पाणी हलले नाही. फक्त महाराष्ट्रातील काम राहिले असून, हा मार्ग जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरिमन पॉईंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल, असेही ते म्हणाले.

एसटी दरात मेट्रो प्रवास
- मी अशी मेट्रो शोधली आहे की, त्याच्या एक किमीसाठी केवळ १ कोटी रुपये खर्च येईल. त्याचा वेग ताशी १४० किमी प्रतितास असेल. मोफत वायफाय - टीव्ही अशा सुविधा यात असतील. 
- त्यामुळे पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते लोणावळा, पुणे - बारामती या मार्गावरून मेट्रो सुरू करता येईल. त्याचा दर एसटीएवढा असेल. 
- मी महाराष्ट्राचा ॲम्बेसिडर म्हणून दिल्लीत काम पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच विभागांच्या कामांकडे माझे लक्ष असते. 
 

Web Title: To connect Delhi directly to Nariman Point; Let's reduce the use of petrol and diesel says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.