दिवा रेल्वे रुळप्रकरणात दहशतवाद्यांचे कनेक्शन?
By admin | Published: January 28, 2017 04:37 AM2017-01-28T04:37:14+5:302017-01-28T04:37:14+5:30
दिवा रेल्वे स्थानकाजवळ थेट रुळावरच आढळलेल्या भल्या मोठ्या रुळप्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून
मुंबई : दिवा रेल्वे स्थानकाजवळ थेट रुळावरच आढळलेल्या भल्या मोठ्या रुळप्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व राज्य दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) चौकशी सुरू केली आहे. राज्य एटीएसने घटनास्थळाचा आढावा घेतला, तसेच काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर १५ फुटी रुळाचा तुकडा आढळून मागच्या काही महिन्यांत देशात रेल्वेचे तीन मोठे अपघात घडले. त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. पूर्व चंपारन, कानपूरमध्ये इंदूर-पाटणा एक्सप्रेस, कोनेरु रेल्वे अपघातांचा यात समावेश आहे. या प्रकरणी बिहारमधून तिघांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी एकजण हा इसिस एजंटच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे दिवा रेल्वे रुळप्रकरणातही त्यांचा हात होता का, या दिशेने एनआयए आणि राज्य एटीएस अधिक तपास करत आहेत.
२६ जानेवारीला एटीएसच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेत तपास सुरू केला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे. मात्र या बाबत एटीएसकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार व असिस्टंट लोको पायलट हितेश चिंचोळे यांच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. घातपातासाठी हा रुळ ठेवल्याची शक्यता वर्तवली जात असून या मागे दहशतवादी संघटनांचा संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.
आला होता.