‘स्वच्छ भारत’चे बोधचिन्ह चिरंतन झाले - अनंत खासबारदार

By admin | Published: November 10, 2016 06:35 AM2016-11-10T06:35:55+5:302016-11-10T06:35:55+5:30

कोणत्याही देशाच्या चलनावर एखादे चित्र, छायाचित्र, एखादी संकल्पना येणे हे खूप मोलाचे असते. २0१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या

The connotation of 'Swachh Bharat' became eternal - infinite sangarabardar | ‘स्वच्छ भारत’चे बोधचिन्ह चिरंतन झाले - अनंत खासबारदार

‘स्वच्छ भारत’चे बोधचिन्ह चिरंतन झाले - अनंत खासबारदार

Next

कोल्हापूर : कोणत्याही देशाच्या चलनावर एखादे चित्र, छायाचित्र, एखादी संकल्पना येणे हे खूप मोलाचे असते. २0१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेसाठी बोधचिन्ह स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये माझ्या (महात्मा गांधीजींची चाळिशी) बोधचिन्हाला देशभरातून पहिला क्रमांक मिळाला. मात्र, हे बोधचिन्ह भारताच्या नव्या चलनी नोटांवरही विराजमान होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया येथील निर्मिती जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खासबारदार यांनी बुधवारी दिली.
नव्या नोटांवर ‘स्वच्छ भारत’चे बोधचिन्ह वापरण्यात आले असून ते खासबारदार यांनी तयार केले आहे. खासबारदार म्हणाले की, कोणत्याही देशाच्या चलनावर अशा पद्धतीने बोधचिन्ह, छायाचित्र वापरताना योगदानाचा विचार केला जातो. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठीचे आम्ही केलेले हे बोधचिन्ह चलनी नोटांवर प्रसिद्ध करण्यासाठीचा निर्णय घेत देशभरातील काळ्या पैशाच्या रूपामध्ये असलेली घाण स्वच्छ केली जाणार असल्याचे संकेतच दिले आहेत. माझे हे बोधचिन्ह चलनी नोटांवर आल्याने आता घराघरांत गेले. कोल्हापूरच्या मातीत निर्माण झालेले हे बोधचिन्ह चिरंतन झाल्याचे खूप मोठे समाधान मला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The connotation of 'Swachh Bharat' became eternal - infinite sangarabardar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.