वाढत्या उन्हाचा पशू-पक्ष्यांवर परिणाम
By admin | Published: April 6, 2017 02:46 AM2017-04-06T02:46:46+5:302017-04-06T02:46:46+5:30
गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला
दासगाव : गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत सोमवारी भरदुपारच्या वेळी कोकिळा पक्षी मृत अवस्थेत सापडला. तर याच परिसरात अनेक पक्षी अस्वस्थ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तर जंगल भागातील माकडांनी मानवी वस्तीत प्रवेश के ला आहे.
गेल्या अठवडाभरापासून उष्णतेचा पारा चढला आहे, तर पाण्याची चणचणदेखील भासू लागली आहे. जंगल आणि उंच भागांतील पाणीसाठा वाढत्या उन्हामुळे संपुष्टात आल्याने प्राणीमात्रांना पाण्यासाठी नागरी वस्तीकडे वळण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड शहर परिसरातील रायगड रस्ता, केंबुर्ली, दासगाव, टोेळ, दाभोळ भागाजवळ असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे वानर वावरताना दिसून येत आहेत. जंगलांमध्ये आंबा, काजूच्या पिकांचा मोसम असताना केवळ पाण्याच्या शोधातच हे वानर जंगलाबाहेर पडले असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त के लाआहे. जंगली वानरांची पाण्यासाठी नागरीवस्तीकडे वाटचाल सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गालगतच केंबुर्ली गाव परिसरात कोकिळा पक्षी मृत्यू अवस्थेत सापडला आहे. केंबुर्ली गाव परिसरात पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा गेल्या दोन महिन्यांपासून असल्यामुळे या पक्ष्याचा पाणी न मिळाल्यामुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. चिमणी, कावळा आणि कोकिळा या पक्ष्यांना पाण्याची अधिक गरज असते, वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून मृत्यू होतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे चक्कर येऊन पडून मृत्यू होतो. तरी नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर
कें द्राचे संचालक गणराज जैन यांनी
के ले आहे. (वार्ताहर)
नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनी के ले आहे.