भगूर येथील सावरकरांच्या निवासस्थानाचे होणार संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:12 AM2019-06-17T03:12:12+5:302019-06-17T03:12:28+5:30

संवर्धनाची विशेष मोहीम; सावरकर स्मारकाकडे सरकारने दिले देखभालीचे दायित्व

Conservation of Savarkar's residence at Bhagur | भगूर येथील सावरकरांच्या निवासस्थानाचे होणार संवर्धन

भगूर येथील सावरकरांच्या निवासस्थानाचे होणार संवर्धन

googlenewsNext

मुंबई : नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेल्या निवासस्थानाच्या देखभालीचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडे दिले आहे. राज्य शासनाच्या संरक्षित योजनेअंतर्गत आता त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने प्राचीन स्मारकांचे संवर्धन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र-वैभव - राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेनुसार स्वातंत्र्यवीरांचे भगूर येथील निवासस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सुपूर्द करण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार नियमानुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची क्षमता स्मारकाचीच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे १२ जून २०१९ या दिवशी शासकीय अध्यादेश प्रकाशित करण्यात आला. या अध्यादेशानुसार लवकरच करारनाम्यावर स्वाक्षरी होऊन अधिकृतपणे स्मारकाच्या वतीने तिथे काम करण्यास सुरुवात होणार आहे.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे स्वत: स्वातंत्र्यवीरांचे नातू आहेत. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रप्रेमींचे श्रद्धास्थान असलेली ही वास्तू परत त्यांच्या वारसाकडे येत आहे, हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे. यामुळे स्मारकाच्या कार्याला अधिक बळकटी येणार आहे.

निवासस्थानाचा लौकिक सर्वदूर पोहोचविणार
या ठिकाणी राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित असलेले कार्य, तसेच उपक्रम निश्चितपणे राबविले जातील, तसेच या निवासस्थानाचा लौकिकदेखील सर्वदूर पोहोचविला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, अशी भावना स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Conservation of Savarkar's residence at Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.