‘हेल्थ केअर उत्पादने सीलबंद करण्याचा विचार करा’
By Admin | Published: January 4, 2017 01:27 AM2017-01-04T01:27:16+5:302017-01-04T01:27:16+5:30
हेल्थ केअर उत्पादने सीलबंध करणे बंधनकारक करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेला निवदेन समजून येत्या सहा महिन्यांत या निवेदनावर निर्णय घ्या, असे निर्देश
मुंबई : हेल्थ केअर उत्पादने सीलबंध करणे बंधनकारक करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेला निवदेन समजून येत्या सहा महिन्यांत या निवेदनावर निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. सौंदर्यप्रसाधनाची उत्पादने, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी उत्पादने व अन्य उत्पादने सीलबंद करूनच त्यांची विक्री करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेल्या गीतांजली दत्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ही उत्पादने सीलबंद नसतात. त्यामुळे त्यास भेसळ होण्याची व कमी प्रमाणात विकली जातात. त्यामुळे केंद्र सरकारला सर्व कंपन्यांना त्यांची उत्पादने सीलबंद करूनच त्यांची विक्री करणे बंधनकारक करा, अशी मागणी दत्ता यांनी याचिकेद्वारे केली होती. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याव्यतिरिक्त या याचिकेत बड्या कंपन्यांना प्रतिवादी केले होते. त्यांनी या याचिकेवर आक्षेप घेत यासंबंधी कायदा नसल्याची माहिती दिली. तसेच कायदा बनवण्याचे आदेश उच्च न्यायालय सरकारला देऊ शकत नाही, असा युक्तिवाद खंडपीठापुढे
केला. त्यामुळे दत्ता यांनी ही
याचिका केंद्र सरकारला निवेदन म्हणून स्वीकारण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती खंडपीठाला केली
होती. (प्रतिनिधी)