धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे निलम गो-हे यांच्याकडून सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 08:02 PM2018-01-29T20:02:11+5:302018-01-29T20:02:31+5:30

जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता

Consolation from Neil Go-He's family of Dharma Patil | धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे निलम गो-हे यांच्याकडून सांत्वन

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे निलम गो-हे यांच्याकडून सांत्वन

Next

मुंबई : जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या सदर कुटुंबाचं सांत्वन करण्याकरिता नीलमताई गोर्हे यांनीआज जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने आधार दिला. यावेळी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील, हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रामस्थ विशाल सुर्यवंशी, पाटील कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल व पाटील कुटुंबीय उपस्थित होते. मंत्रीमहोदय आणि पाटील कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलम हे ‌म्हणाल्या,"ऑक्टोबर २०१२ मध्ये केलेल्या पंचनाम्यानुसार भरपाई मिळावी अशी मागणी पाटील कुटुंबायांची आहे.

तत्कालीन सरकारकडून त्यांना  नुकसान भरपाई देण्यात आली होती ती बळजबरीने लादण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती पण त्याची दखल घेतली गेली नाही. हा भूसंपादन प्रस्ताव ७/२००९ क्र.असून ८/५/२००९ला प्रस्ताव दाखल झाला व तो  २६/२/२०१४ ला अंतीम अधीसूचना निघाली. विशेष म्हणजे महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने घेतलेल्या जमिनी ६७५ हेक्टर ३२ आर, तर भूसंपादनामार्फत संपादित जमिनी १९९ हेक्टर २७ आर आहेत. महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने जमिनी संपादित करतांना मनमानी कारभार करून शेतकर्यांशी संवेदनाहीन वर्तन केले म्हणून त्यांच्याही तत्कालीन अधिकार्यांच्या चौकशीची व त्यांच्यावर कारवाईची मागणी आ.डाँ.नीलम गोर्हे यांनी केली आहे.
                               
आज दि.२८ जाने २०१८ला जेजे हॉस्पिटल येथे सुधारित नुकसान भरपाईबाबत पहाणीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाटील कुटुंबियांना देण्यात आले आहे. असे असले तरी या व इतर ज्या ज्या शेतकर्यांच्या मोबदल्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींचे निराकरण महसूल, ऊर्जा या विभागांनी करावे असेही आ.डाँ. नीलम गोर्हे यांनी सरकारला सुचविले आहे व अधीवेशनातही त्याचा पाठपुरावा करणार आहेत

Web Title: Consolation from Neil Go-He's family of Dharma Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.