४९ पोलीस अधिकाऱ्यांची एकत्रित विभागीय चौकशी
By admin | Published: August 13, 2015 03:10 AM2015-08-13T03:10:36+5:302015-08-13T03:10:36+5:30
पोलीस दलातील ४९ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा उद्या (गुरुवार) फैसला होण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण न झाल्याने वर्षानुवर्षे पदोन्नती, वेतनवाढीच्या लाभापासून
Next
मुंबई : पोलीस दलातील ४९ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा उद्या (गुरुवार) फैसला होण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण न झाल्याने वर्षानुवर्षे पदोन्नती, वेतनवाढीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या या पोलिसांच्या प्रकरणांची एकत्रितपणे फेरसुनावणी घेण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे मरिन लाइन्स येथील पोलीस जीमखान्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
विविध आरोप असलेल्या या अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागत आहे. ती पूर्ण न झाल्याने त्यातील अनेक जण अनेक वर्षांपासून ‘साइड पोस्टिंग’मध्ये खितपत पडलेले आहेत.