हे माझ्याविरोधातील षडयंत्र - निलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 09:50 AM2016-04-26T09:50:37+5:302016-04-26T13:05:14+5:30
संदीपने मागितलेले पैसे मी दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - संदीपने मागितलेले पैसे मी दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. मेळाव्यास उपस्थित राहिला नाही म्हणून काँग्रेस पदाधिकारी संदीप सावंत याला मारहाण केल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांच्यावर लावण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध ठाणे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र निलेश राणे यांनी आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे सांगत इतर आपला कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून इतर पक्षांच्या साथीने रचलेला बनाव असल्याची टीका केली आहे. चिपळूण येथे मराठा महासंघ आरक्षण यांचा मेळावा होता, जेथे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेही आले होते. गेल्या दशकभरापासून काँग्रेससाठी झटणारे संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्याने मेळाव्याला जाऊ शकले नाहीत. याचा राग मनात धरून निलेश राणे यांनी आपल्या समर्थाकांसोबत सावंत यांचे घर गाठले आणि आपल्याला काही बोलायचे आहे असं सांगून खाली नेले. त्यानंतर राणेंनी सावंत यांना मारत गाडीत कोंबले. रात्रभर मारहाण करत मुंबईला आणले असा आरोप सावंत यांनी राणे यांच्यावर केला होता.
मात्र आपण सावंत यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याकडे १० लाख रुपये मागितले होते, ते मी त्यांना देऊ शकलो नाही. याचाच राग मनात धरून सावंत इतर पक्षांकडे गेले आणि माझ्याविरुद्ध ही राजकीय खेळी रचली, असे राणे यांनी सांगितले. सावंत यांनी स्वत:लाच इजा करून घेतली आणि ते रुग्णालयात दाखल झाले, असेही ते म्हणाले.