शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षड्यंत्र!
By Admin | Published: February 5, 2016 04:14 AM2016-02-05T04:14:37+5:302016-02-05T04:14:37+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना सोयीचे निर्णय घेताना या सरकारकडे पैसा असतो
बुलडाणा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना सोयीचे निर्णय घेताना या सरकारकडे पैसा असतो; मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी, कापसाचे अनुदान, दुष्काळी मदत देताना पैसा नसतो. शेतकऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र सरकारकडून रचले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी केला.
मोताळा येथे युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित एल्गार मोर्चात ते बोलत होते. मंचावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आ. राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंग, अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव हरेकृष्णा, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके, ज्येष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज कायंदे आदी उपस्थित होते.
ब्रार म्हणाले ‘केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे. निर्यातमूल्य वाढविले, भूमी अधिग्रहणसारखा कायदा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र काँग्रेसने आता रस्त्यावर उतरायला हवे. (प्रतिनिधी)