कॉन्स्टेबल काळोखेची महिला तस्कर प्रेयसी?

By Admin | Published: March 12, 2015 05:17 AM2015-03-12T05:17:09+5:302015-03-12T05:17:09+5:30

एमडीसाठ्यासह सातारा पोलिसांनी गजाआड केलेल्या धर्मराज काळोखे हा पोलीस शिपाई गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री

Constable Kalokhechi female smuggler lovable? | कॉन्स्टेबल काळोखेची महिला तस्कर प्रेयसी?

कॉन्स्टेबल काळोखेची महिला तस्कर प्रेयसी?

googlenewsNext

जयेश शिरसाट, मुंबई
एमडीसाठ्यासह सातारा पोलिसांनी गजाआड केलेल्या धर्मराज काळोखे हा पोलीस शिपाई गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या महिलेच्या संपर्कात होता, अशी माहिती हाती आली आहे. या महिलेसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध होते. याच संबंधांमधून तो अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्यांचे समजते.
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेल काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या अत्यंत घातक अंमलीपदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. त्याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोलीस ठाण्यातील त्याच्या एका कपाटात काळोखेने दडवून ठेवलेले १२ किलो एमडी आणि ३३ हजारांची रोकड जप्त केले. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळोखे अंमलीपदार्थांच्या तस्करीत अडकला तो बेबी पेडणेकर या महिलेमुळे. ५०वर्षांच्या बेबीचा वरळीच्या जीजामाता नगर झोपडपटटीत अंमलीपदार्थांचा अडडा होता. १५ वर्षांपुर्वी काळोखे वरळी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना त्याची तिच्याशी ओळख व त्याचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. पोलिसांची धाड पडल्यानंतर ती परतावयाची याची माहिती तो तिला देत असे. गेल्यावर्षी ३० डिसेंबरला पोलिसांनी बेबीच्या वरळीतल्या घरातून एमडीचा साठा हस्तगत केला होता. या प्रकरणी बेबीची सून आणि तिचा बाप उपेंद्र माझगावकर यांना अटक करण्यात आली होती. तर बेबी फरार होती. दरम्यान, अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी काळोखेची कसून चौकशी केली.

Web Title: Constable Kalokhechi female smuggler lovable?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.