२० फुटांवरून उडी मारून कॉन्स्टेबलने वाचवले इसमाचे प्राण
By Admin | Published: September 15, 2015 05:49 PM2015-09-15T17:49:52+5:302015-09-15T17:50:13+5:30
नाशिकमध्ये कुंभमेळ्यादरम्यान कॉन्स्टेबलने २० फटांवरून उडी मारून बुडणा-या इसमाचे प्राण वाचवले.
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १५ - कुंभमेळ्यादरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलचे प्रसंगावधान व कर्तव्यदक्षतेमुळे एका माणसाचे प्राण वाचले आहेत. मनोज बारहाते असे त्या कॉन्स्टेबलचे नाव असून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने २० फुटांवरून नदीत उडी मारणा-या इसमाच्या पाठोपाठ मनोजने उडी मारून त्या माणसाचे प्राण वाचवले.
मनोज कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी ड्युटीवर असून ते अमरधाम पुलावर गस्त घालत होते. त्याचवेळी एक माणूस पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसले. मनोज यांच्या सहकारी पोलिसांनी त्या इसमाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झुगारून त्या इसमाने पुलावरून खाली उडी मारलीच. हे पाहिल्यावर त्या इसमाला वाचवण्यासाठी मनोज यांनी कोणताही विचार न करता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता पुलावरून खाली उडी मारून त्या माणसाचे प्राण वाचवले.