बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:21 AM2017-07-21T10:21:47+5:302017-07-21T10:21:47+5:30

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Constabulary for three days at Kondeshwar Falls in Badlapur | बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

बदलापूर, दि. 21-  पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वीकेंड, गटारी तसंच पावसामुळे होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे. श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीचा हा वीकेंड आहे. त्यामुळे मोठी गर्दी होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २१ ते २३ जुलैदरम्यान कोंडेश्वरला जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीनुसार कोणालाही कोंडेश्वर धबधव्यावर जाता येणार नाही. त्यामुळे या विकेण्डला कोंडेश्वर धबधब्यावर जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. 
 
मुंबईपासून जवळच असणाऱ्या कोंडेश्वरला पर्यटक दरवर्षी तुफान गर्दी करतात. मागच्या आठवड्यात इथं एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता, तर पोलिसांनी तब्बल २५ पर्यटकांना बुडताना वाचवलं होतं.
 
मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात
 

Web Title: Constabulary for three days at Kondeshwar Falls in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.