वैतरणा, पिंजाळवर बंधारे बांधा
By admin | Published: May 14, 2017 02:25 AM2017-05-14T02:25:27+5:302017-05-14T02:25:27+5:30
शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला
वसंत भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही. प्रस्तावित प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पातील काही टक्के पाणी या तालुक्याला मिळाल्यास पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागणार नाही. तालुक्यातील नद्यांवरून १० कि.मी. अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले तर केवळ पिण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. मात्र लोकप्रतिनिधी क्रियाशील नसल्यामुळे तालुका तहानलेला आहे.
वाडा: तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. पंरतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने तो तहानलेला आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी प्रत्येक नदीवर १० कि.मी. वर बंधारे बांधल्यास व तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. ८६ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. येथे औद्यागिकीकरणाला वेग वाढत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, तानसा, गारगाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र पाण्याचा लाभ या तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. यासाठी आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा व इतर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
मागील वर्षी खासदार हेमंत गोडसेकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा वाडा तालुक्यातील पिंजाळ व गारगाई नदीचे वाया जाणारे पाणी देव नदीत टाळण्यासाठी आग्रही असणारे तेथील खासदार गोडसे यांची तसा प्रस्ताव बनवून तो केंद्र सरकारला सादर करून केंद्र सरकारकडून त्यांचे सेर्वेक्षण देखील सुरू होते.
नाशिकचे खासदार असा प्रस्ताव सादर करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना सूचत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका श्रीकांत भोईर यांनी केली.
उद्योजकांची बाजूही लक्षात घ्यावी
औद्योगिकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणे ही अनेक गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
या गावांचे प्रस्ताव प्रलंबित
दुर्गम भाग रोकरे पाडा, जांभूळपाडा, साखरशेत, आणेवाडी, दिवेपाडा या गावांना टँकरने पाण पुरवठा चालू करण्यात आला आहे तर येणारा उज्जैनी, वळवी पाडा, थापरपाडा, पाचघर, निळमाळ, तोरणे, चिंचेपाडा , रोजगार, ककडपाडा, बेलखाचर, कुसवडे, वांगणपाडा, मोरसेपाडा, ठाकूरपाडा, फणसपाडा, वारलीपाडा या गावांना पाणीटंचाई असून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असून त्यांची मान्यता मिळाली की, लगेचच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाख अभियंता प्रमोद भोईर यांनी दिली.
खोदाई मर्यादा
३५० फूट करा
सरकारकडून कूपलिकांची खोदाई २०० फूटांपर्यंत करण्याचा नियम आहे. व सध्या पाण्याची पातळी खोल गेल्याने काही ठिकाणी २०० फुटांपर्यंत पाणी लागत नाही व केलेला खर्च वाया जातो त्यामुळे हा नियम बदलून ३५० फुटापर्यंत खोदाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पणरे यांनी दिली आहे.