बांधकामे सुरू; मात्र नियम मोडल्यास १० हजार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:01 AM2021-04-06T04:01:20+5:302021-04-06T04:01:40+5:30

राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामे नियम व अटींच्या बंधनात सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नियमांचे उल्लंघन केल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल.

Construction begins; But if you break the rules, you will be fined Rs 10,000 | बांधकामे सुरू; मात्र नियम मोडल्यास १० हजार दंड

बांधकामे सुरू; मात्र नियम मोडल्यास १० हजार दंड

Next

मुंबई :  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत काही कठोर निर्बंध घातले आहेत. राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामे नियम व अटींच्या बंधनात सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नियमांचे उल्लंघन केल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल.

मागील काही महिन्यांमध्ये राज्यात घर विक्री चांगल्या प्रमाणात झाली. राज्य सरकारच्या तिजोरीतदेखील कोट्यवधींची भर पडली. सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी विकासकाला नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या नियमांचे पालन गरजेचे
कामगार प्रकल्पाच्या ठिकाणीच राहतील अशी व्यवस्था करावी. बाहेरील व्यक्ती आत येणार नाही, आतील बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
यादरम्यान बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची आवक सुरू राहील. 
येथे काम करणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी. त्याआधी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट साेबत ठेवावा. ताे १५ दिवसांसाठी वैध राहील. 
(याची अंमलबजावणी १० एप्रिलपासून सुरू होईल)  
कामगारास कोरोना झाल्यास रजा, रजेदरम्यान पूर्ण वेतन द्यावे लागेल.
वरील नियम न पाळल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास बांधकाम पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील.

Web Title: Construction begins; But if you break the rules, you will be fined Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.