चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार

By admin | Published: April 11, 2015 12:07 AM2015-04-11T00:07:24+5:302015-04-11T00:07:24+5:30

सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्णात शासकीय सैनिकी शाळा उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, असा एकमुखी ठराव

Construction of military schools in Chandrapur | चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार

चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार

Next

मुंबई : सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्णात शासकीय सैनिकी शाळा उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, असा एकमुखी ठराव आज विधानसभेने मंजूर केला. त्याचवेळी सातारा येथील शाळा अद्ययावत करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
तावडे यांनी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा ठराव मांडल्यानंतर त्यावर बोलताना जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुधीर गाडगीळ यांनी सातारा येथील शाळेच्या समस्या मांडल्या. या ठिकाणी तावडे यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अनिल गोटे यांनी धुळे वा नंदुरबार जिल्ह्णात अशी शाळा उभारण्याची मागणी केली. प्रत्येक महसूल विभागात अशी एक शाळा असावी, असे मत ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासगी सैनिकी शाळांना वारंवार विनंती करूनही सैन्यदलाकडून आवश्यक सामग्री मिळत नसल्याची तक्रार केली.
सातारा येथील शाळेच्या समस्यांचा आढावा आपण आधीच घेतला आहे. त्या बाबत पुन्हा बैठक घेऊन समस्या सोडवू, असे तावडे यांनी सांगितले. त्या नंतर चंद्रपूरच्या शाळेचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Construction of military schools in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.