नेहरू उद्यानाच्या जागेवर बांधकाम
By admin | Published: June 11, 2016 03:25 AM2016-06-11T03:25:49+5:302016-06-11T03:25:49+5:30
खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
खालापूर : खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहराच्या शास्त्रीनगर या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या उद्यानावर एका समाजाला समाज मंदिर बांधण्याची परवानगी दिल्याने येथील रहिवाशांसह इतर पर्यावरण, राजकीय, सामाजिक संघटना पालिकेच्या निर्णयाविरोधात आक्र मक झाल्या आहेत. सुस्थितीत असणाऱ्या उद्यानावर बांधकाम सुरू केल्याने पालिकेविरोधात रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे .
पालिकेने उद्यानाच्या भूखंडावर बांधकाम सुरु करण्यासाठी उद्यानातील खेळणी बाजूला केली आहेत तर नेहरू उद्यान हे एकमेव उद्यान असून विरंगुळ्यासाठी नागरिकांची, लहान मुलांची कायमच वर्दळ असते. पालिकेने या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याने येथील रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवला आहे. (वार्ताहर)
पालिके वर क ाढणार मोर्चा
शास्त्रीनगर भागात नेहरु हे एकमेव उद्यान चांगल्या दर्जाचे असून लहान मुले यांना याच उद्यानाचे आकर्षण आहे. दरम्यान, जे काम पालिका करीत आहे ते नियमबाह्य आहे. पालिकेने बांधकाम करण्यासाठी वृक्षतोड केली असून खेळाचे साहित्य काढले आहेत. दोषींवर कारवाई व्हावी आणि या ठिकाणी उद्यानच राहण्यासाठी पालिकेवर सोमवारी मोर्चा काढणार आहे, असे काँग्रेस कार्यकर्ते रॉबिन सॅम्युएल यांनी सांगितले.
अशा प्रकारे सुसज्ज उद्यानाच्या जागेवर थेट अतिक्र मण करून बांधकाम करून उद्यान भकास करण्याचा हा प्रयत्न लाजिरवाणा असून पालिकेने हा चुकीचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी पालिकेवर गुन्हा दाखल करु न संबंधितांवर कारवाई व्हावी.
- संदीप पाटील, सेना कार्यकर्ते