बांधकाम कामगारांच्या उपकरात अफरातफर?
By Admin | Published: July 17, 2015 01:35 AM2015-07-17T01:35:55+5:302015-07-17T01:35:55+5:30
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवारा बांधकाम कामगार संघटनेने केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवारा बांधकाम कामगार संघटनेने केला आहे.
उपकरामधून जमा होणाऱ्या निधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा संघटनेने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंडळाच्या २०११ ते २०१४पर्यंतच्या कारभारावर कॅगने अहवाल सादर केला आहे. त्यात मंडळाचे अध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांनी उपकरातून जमा होणारी रक्कम डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशने स्वीकारल्याचा ठपका ठेवला आहे. त्यात १७ कोटी ५९ लाख रुपयांचे धनादेश वटलेच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे बनावट धनादेश देणाऱ्यांवर मंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे बनावट धनादेश देणाऱ्यांना सवलत देऊन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.