महावितरणचा घरगुती ग्राहकांना दिलासा

By admin | Published: March 18, 2015 01:51 AM2015-03-18T01:51:34+5:302015-03-18T01:51:34+5:30

महावितरणने घरगुती ग्राहकांचे वीजदरात कपात केली आहे. ० ते १०० युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर ४.१६ हून ३.६५ इतका कमी करण्यात आला आहे.

Consumers of Mahavitaran's domestic customers | महावितरणचा घरगुती ग्राहकांना दिलासा

महावितरणचा घरगुती ग्राहकांना दिलासा

Next

मुंबई: महावितरणने घरगुती ग्राहकांचे वीजदरात कपात केली आहे. ० ते १०० युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर ४.१६ हून ३.६५ इतका कमी करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये हा दर आणखी कमी होऊन प्रति युनिट ३.३६ होणार आहे. तर १०१ ते ३०० युनिट वीज वापर करत असलेल्यांसाठी हा दर प्रति युनिट ७.३९ हून ६.५४ आणि एप्रिलमध्ये ६.०५ लागू असा होणार
असल्याचे महावितरणमधील सूत्रांनी सांगितले.
डिसेंबर २०१४ पासून वीजदरवाढ लागू असलेल्या अनुदानाबाबत शासनाने निर्णय घेतला होता. तरीही कृषीपंपाच्या बाबतीत मात्र शासनाने वेगळी भूमिका घेत दरमहा ९२ कोटींचे अनुदान कायम ठेवले आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठीदेखील ३६५ कोटींचे अनुदान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देण्यात आले. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे.
एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना फेब्रुवारीत प्रति युनिट असलेला ८.५९ हा दर मार्चमध्ये ७.५९ प्रति युनिट झाला. तो आता एप्रिलमध्ये आणखी कमी होत प्रति युनिट ७.०१ एवढा होणार आहे.
नॉन एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांकडून फेब्रुवारीतील प्रति युनिट ७.८२ ऐवजी मार्चमध्ये ६.८८ एवढा दर आकारला जाईल. तर एप्रिल महिन्यात ही आकारणी ६.३३ नुसार होणार आहे. वाणिज्यिक ग्राहकांना देखील मार्चमध्ये प्रति युनिट ९२ पैसे ते १.६३ पैसे एवढा दिलासा मिळणार आहे. एप्रिलमध्ये हा दर प्रति युनिट १.४५ ते २.५८ पैसे असा असेल. विद्युत नियामक आयोगाने मंजुरी देवून नवीन दर लागू होईपर्यंत हे बदल राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Consumers of Mahavitaran's domestic customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.