ग्राहकांना आता वीजविषयक डिजिटल नोटीसा, राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:35 PM2018-09-24T19:35:05+5:302018-09-24T19:35:16+5:30
विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.
मुंबई : थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, आता विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.
महावितरणने मा. विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालानुसार आयोगाने राज्यात महावितरणला थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप,एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठविण्यास परवानगी दिली असून डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे.
महावितरण मागील कांही वर्षापासून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. महावितरणने २ कोटी 5 लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीजपुरवठा व विजेविषयक विविध बाबींची माहिती देण्यात येत आहे.