पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

By admin | Published: November 6, 2014 12:02 AM2014-11-06T00:02:55+5:302014-11-06T00:20:23+5:30

जलसंपदा विभागाचा निर्णय ; पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान.

Consumption of water will be used by the institutions! | पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

Next

अकोला: राज्यातील पाणी वापर संस्थांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यासाठी १0 ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात पाणी वापर संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
शेतीसाठी पाण्याचे समान वाटप करण्यासह पाण्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे असते. राज्यात १८ लाख ६४ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर एकूण ४ हजार ६७६ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली आहे. पाणी वापर संस्था सक्षम असल्यास पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्याच्या सूचना, शासनाने राज्यातील सर्वच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. अभियानात सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, शाखा अभियंता, मुख्य अभियंता, स्वयंसेवी संस्था, पुरस्कार प्राप्त पाणी वापर संस्था सहभागी होणार आहेत. शासनाने अभियानाची रूपरेषाही निश्‍चित केली आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत प्रधान सचिव ७ नोव्हेंबरला ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सह्णद्वारे आढावा घेणार आहेत.

*पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण
अभियानातंर्गत पाणी वापर संस्थांचे ह्यअह्ण, ह्यबह्ण आणि ह्यकह्ण, असे तीन गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. वर्गीकरणासाठी काही निकषही लावण्यात येणार आहेत.

*ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याचे आदेश
पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्याच्या सूचना महाराष्ट्र जनसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्र हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना प्राधान्याने पाणी मोजके बसवून घनमापन पद्धतीने पाणी मोजून देण्यात येणार आहे. यासाठी तात्काळ ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याच्या सूचना, शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.

Web Title: Consumption of water will be used by the institutions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.